व्हॅलेंटाइन्सच विकचा सहावा दिवस म्हणजेच ‘किस डे’. ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या केवळ एक दिवस आधी येणारा हा दिवस म्हणजे प्रेमाचा शेवटचा टप्पाच म्हणावा लागेल. आज याच किस डे निमित्त आम्ही तुम्हाला किस या शब्दाचा उगम कसा झाला याबद्दल सांगणार आहोत. किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द कुठून आला याबद्दल ठोस माहिती कोणालाच नसली तरी अनेकांच्या मते चुंबन घेताना लोक जो आवाज करतात त्यावरून या मूळ शब्दाची निर्मिती झाली असणार.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews